झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री हा ज्युरी सदस्यांद्वारे निवडला जाणारा पुरस्कार आहे जो वार्षिक झी सिने पुरस्कारांचा एक भाग आहे. बॉलीवूडच्या नवीन अभिनेत्रींना पुरस्कार देतात जिथे त्यांना काही क्षमता दिसते. पहिला झी सिने पुरस्कार १४ मार्च १९९८ रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून, पुरस्कार सोहळा वेगवेगळ्या देशांमध्ये आणि खंडांमध्ये आयोजित केला जात आहे.

पहिल्या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पदार्पणा अभिनेत्रीसाठी महिमा चौधरी ही प्राप्तकर्ता ठरली. तिला परदेस (१९९७) चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला. वर्षे २००६, २०१३, २०१६, २०२० आणि २०२४ मध्ये हा पुरस्कार विभागून दोन अभिनेत्रींना दिला गेला होता. २००६ मध्ये कोंकणा सेन शर्मा व विद्या बालन, २०१३ मध्ये इलिआना डिक्रुझ व यामी गौतम, २०१६ मध्ये हर्षाली मल्होत्रा व भूमी पेडणेकर, २०२० मध्ये अनन्या पांडे व तारा सुतारिया आणि २०२४ मध्ये मेधा शंकर व अलिझेह अग्निहोत्री. २०२० चा पुरस्कार हा दोघी पांडे व सुतारिया यांना एकच स्टूडंट ऑफ द यीअर २ चित्रपटासाठी होता. २००७ चा पुरस्कार कंगना राणावत यांना गॅंगस्टर आणि वो लम्हे या दोन्ही चित्रपटांसाठी एकत्रित मिळाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →