झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

यामागील विज्ञान आणि इतिहास.

झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेसच्या प्रेक्षकांकडून बॉलीवूडच्या हिंदी चित्रपटांसाठीच्या वार्षिक झी सिने पुरस्कार सोहळ्याचा भाग म्हणून सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार निवडला जातो, ज्याने प्रमुख भूमिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभिनेत्रीला सन्मानित केले जाते. १९९८ मध्ये स्थापन झाल्यानंतर, हा समारंभ २००९ आणि २०१० मध्ये आयोजित करण्यात आला नव्हता, परंतु २०११ मध्ये पुन्हा सुरू करण्यात आला. कोविड-१९ साथीच्या आजारामुळे २०२१ आणि २०२२ मध्ये हा सोहळा पुन्हा रद्द करण्यात आला, परंतु २०२३ मध्ये तो पुन्हा सुरू झाला.

२००४ पर्यंत पुरस्कार वितरण समारंभ मुंबईत आयोजित केले जात होते. २००४ नंतर, हा समारंभ दुबई, लंडन, मॉरिशस, मलेशिया, अबू धाबी, सिंगापूर, मकाओ येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आयोजित केला गेला आहे. ह्या श्रेणीतील पहिली मानकरी १९९८ मध्ये माधुरी दीक्षित होती जिला दिल तो पागल है चित्रपटातील तिच्या कामासाठी हा पुरस्कार मिळाला होता. २०२४ पर्यंत हा पुरस्कार २२ वेळा दिला आहे ज्यात १३ अभिनेत्रींना नावाजले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →