विरासत हा १९९७ चा भारतीय हिंदी भाषेतील अॅक्शन नाट्य चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले आहे. ही कथा कमल हासन यांनी लिहिली होती आणि थेवर मगन या तमिळ चित्रपटाच्या यशानंतर ती पुन्हा तयार करण्यात आली होती. मुशीर-रियाझ जोडीने या चित्रपटाची निर्मिती केली. यात अनिल कपूर, तब्बू, अमरीश पुरी, पूजा बत्रा, मिलिंद गुणाजी आणि गोविंद नामदेव यांच्या भूमिका आहेत. चित्रपतातील गाण्यांना संगीत अनू मलिक यांनी दिले आणि एस.पी. वेंकटेश यांनी पार्श्वसंगीत दिले होते. या चित्रपटामुळे प्रियदर्शनचे हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन झाले. संगीत दिग्दर्शक अन्नू मलिक यांनी तेवर मगन यांच्या इळैयराजाच्या काही मूळ सूरांचा पुन्हा वापर केला. या चित्रपटात "पायले चुनमुन" या गाण्यासाठी तब्बूने बीटबॉक्सिंग केले आहे.
४३ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये विरासतला सोळा नामांकने मिळाली, ज्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (प्रियदर्शन), सर्वोत्कृष्ट अभिनेता (कपूर), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (तब्बू) आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (बत्रा) आणि सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण (बत्रा) यांचा समावेश आहे. सात श्रेणींमध्ये चित्रपटाला पुरस्कार मिळाले, ज्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक), सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट कथा यांचा समावेश आहे.
विरासत (१९९७ चित्रपट)
या विषयावर तज्ञ बना.