झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) याची निवड झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेसने आयोजित केलेल्या ज्युरीद्वारे केली जाते. हा हिंदी चित्रपट उद्योगासाठी झी सिने पुरस्काराचा एक भाग आहे. "सिनेमातील उत्कृष्टता - लोकशाही मार्गाने" हे ह्या पुरस्काराचे ब्रिदवाक्य आहे. नोव्हेंबर १९९७ मध्ये त्यांची स्थापना करण्यात आली. ह्या श्रेणीतील पुरस्कार २००५ पासून सुरू झाले. हा समारंभ २००९ आणि २०१० मध्ये आयोजित करण्यात आला नव्हता, परंतु २०११ मध्ये पुन्हा सुरू करण्यात आला. कोविड-१९ साथीच्या आजारामुळे २०२१ आणि २०२२ मध्ये हा सोहळा पुन्हा रद्द करण्यात आला, परंतु २०२३ मध्ये तो पुन्हा सुरू झाला.
२००४ पर्यंत पुरस्कार वितरण समारंभ मुंबईत आयोजित केले जात होते. २००४ नंतर, हा समारंभ दुबई, लंडन, मॉरिशस, मलेशिया, अबू धाबी, सिंगापूर, मकाओ येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आयोजित केला गेला आहे. ह्या श्रेणीतील पहिली मानकरी २००५ मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय होती जिला रेनकोट चित्रपटातील तिच्या कामासाठी हा पुरस्कार मिळाला होता. २०२४ पर्यंत हा पुरस्कार १६ वेळा दिला आहे ज्यात १३ अभिनेत्रींना नावाजले आहे.
झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?