झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२०-२१

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२०-२१

झिम्बाब्वे क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी मार्च २०२१ मध्ये संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे या दोन देशांनी एकमेकांविरुद्ध पहिल्यांदाच कसोटी सामना खेळला. नियोजनानुसार ही मालिका ओमानमध्ये आयोजित केली होती. परंतु जानेवारी २०२१ मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ही मालिका संयुक्त अरब अमिरातीला हलविली.

सर्व सामने हे अबु धाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात आले. कसोटी मालिकेतील पहिली कसोटी झिम्बाब्वेने १० गडी राखत जिंकली. झिम्बाब्वेने शेवटचा कसोटी सामना हा नोव्हेंबर २०१८मध्ये बांगलादेशविरुद्ध जिंकला होता. पुनरागमन करत अफगाणिस्तानने दुसरी कसोटी जिंकून कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. दुसऱ्या कसोटीत हश्मातुल्लाह शहिदी याने द्विशतक झळकवले. कसोटीत द्विशतक ठोकणारा शहिदी हा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरला.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका अफगाणिस्तानने ३-० अशी जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →