पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२०-२१

या विषयातील रहस्ये उलगडा.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२०-२१

पाकिस्तान क्रिकेट संघाने एप्रिल - मे २०२१ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. सर्व सामने हे हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळवले गेले.

पाकिस्तानने पहिला ट्वेंटी२० सामना जिंकत दौऱ्याची विजयी सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत झिम्बाब्वेने मालिकेत जोरदार पुनरागमन केले. हा पाकिस्तानवर झिम्बाब्वेने मिळवलेला पहिला ट्वेंटी२० विजय होता. दोन सामने झाल्यानंतर मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली होती. तिसरा आणि शेवटचा सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवत तीन सामन्यांची ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.

कसोटी मालिका पाकिस्तानने २-० ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →