बांगलादेश क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२२

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

बांगलादेश क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२२

बांगलादेश क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै २०२२ दरम्यान झिम्बाब्वेचा दौरा केला. सर्व सामने हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झाले. दौऱ्यापूर्वी नुरुल हसनची बांगलादेशच्या ट्वेंटी२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली.

झिम्बाब्वेने पहिला ट्वेंटी२० सामना १७ धावांनी जिंकला. हा झिम्बाब्वेचा सलग सहावा आं.ट्वेंटी२० विजय होता, आत्तापर्यंतची झिम्बाब्वेची सर्वोत्कृष्ट कामगिरी. बांगलादेशने दुसरा सामना जिंकला. परंतु तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात विजय मिळवून झिम्बाब्वेने आं.ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली. झिम्बाब्वेने बांगलादेशला पहिल्यांदाच ट्वेंटी२० मालिकेमध्ये हरविले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका देखील झिम्बाब्वेने २-१ अश्या फरकाने जिंकून इतिहास रचला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →