जेटब्लू

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

जेटब्लू

जेटब्ल्यू (JetBlue Airways Corporation) ही कमी दरात विमानसेवा पुरवणारी एक अमेरिकन विमान वाहतूक कंपनी आहे. १९९८ साली स्थापन झालेली जेटब्ल्यू अमेरिकेच्या अनेक शहरांसह कॅरिबियन, मध्य अमेरिका इत्यादी देशांमधील शहरांना देखील प्रवासी विमानसेवा पुरवते. न्यू यॉर्क शहराच्या क्वीन्स भागात जेटब्ल्यूचे मुख्यालय असून जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तिचा प्रमुख तळ आहे.

जेटब्ल्यू अमेरिका, मेक्सिको, पेरू, पोर्तो रिको, बहामास, बर्म्युडा, बार्बाडोस, कोलंबिया, कॉस्टा रिका, डॉमिनिकन प्रजासत्ताक, ग्रेनेडा, जमैका, मेक्सिको, त्रिनिदाद आणि टोबॅगो सह ९७ ठिकाणि विमानसेवा पुरवते.

जेट ब्लू एरवेझ कॉर्पोरेशन किंवा जेट ब्लू ही एक अमेरिकन विमान कंपनी आहे जी अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाची सगळ्यात मोठी विमानकंपनी आहे. तसेच त्यांचे कॉटनवूड हाइटस, उताह येथे सुद्धा कॉर्पोरेट ऑफिस आहे.

मार्च २०१६ च्या आकडेवारीनुसार जेट-ब्लूच्या अमेरिका, मेक्सिको, करेबिअन, सेन्ट्रल अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेमध्ये १०० ठिकाणी सेवा आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →