जॅक्सनव्हिल हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या फ्लोरिडा राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर फ्लोरिडाच्या ईशान्य भागात जॉर्जिया राज्याच्या सीमेजवळ अटलांटिक महासागराच्या किनाऱ्याजवळ व सेंट जॉन नदीच्या काठावर वसले आहे. ८.२१ लाख शहरी व १५.२५ लाख महानगरी लोकसंख्या असलेले जॅक्सनव्हिल अमेरिकेमधील ११वे मोठे शहर आहे. तसेच २,२९३ वर्ग किमी इतक्या विस्तृत भागात पसरलेले जॅक्सनव्हिल क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील सर्वात मोठे शहर आहे. अँड्र्यू जॅक्सन ह्या सातव्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे नाव ह्या शहराला देण्यात आले आहे.
बारमाही सौम्य हवा असणारे जॅक्सनव्हिल फ्लोरिडामधील एक मोठे पर्यटनकेंद्र असून येथे अनेक उल्लेखनीय गोल्फ मैदाने आहेत.
जॅक्सनव्हिल (फ्लोरिडा)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.