जीएन-झेड११ (GN-z11)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

जीएन-झेड११ (GN-z11)

जीएन-झेड११ (GN-z11) ही सप्तर्षी या तारकासमूहातील एक उच्च-रेडशिफ्ट दीर्घिका आहे. ती सध्या (२०१६ साली) जगाला माहित असलेली दृश्य विश्वातील सर्वात दूर अंतरावरील दीर्घिका आहे. तिचा रेडशिफ्ट (z) ११.०९ इतका आहे, याचा अर्थ ही दीर्घिका पृथ्वीपासून ३२ अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर आहे. GN-z11 या दीर्घिकेला ती १३.४ अब्ज वर्षांपूर्वी म्हणजे महास्फोटानंतर फक्त ४० कोटी वर्षांनंतर जशी अस्तित्वात होती तशी पाहण्यात आली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →