चारुशीला साबळे

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

चारुशीला साबळे ह्या एक मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आहेत. शाहीर साबळे आणि भानुमती बनसोडे या जोडप्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. देवदत्त साबळे, वसुंधरा आणि यशोधरा ही त्यांची भावंडे असून संपूर्ण साबळे कुटुंब हे लोककलेला वाहिलेलं आहे.

हिंदी चित्रपट अभिनेते अजित वाच्छानी सोबत त्यांचा विवाह झाला. त्यांना त्रिशाला आणि योहाना अशा दोन मुली झाल्या. त्रिशाला हवाई सुंदरी असून योहाना ह्या एक अभिनेत्री म्हणून आपली कारकीर्द सांभाळत आहेत.

इ.स. १९८७ मधील गंमत जंमत या मराठी चित्रपटातील त्यांची अशोक सराफ सोबतची जोडी आणि किशोर कुमार व अनुराधा पौडवाल यांनी यांनी गायलेले गाणे 'अश्विनी ये ना' ये त्यांना चांगलीच ओळख देऊन गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →