चरखी दादरी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

चरखी दादरी हे हरियाणा राज्यातील शहर आहे. हे चरखी दादरी जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. चरखी दादरी दिल्लीपासून अंदाजे ९० किमी अंतरावर आहे.

या शहराची स्थापना १४व्या शतकामध्ये बिल्हन सिंह यानी केली.

१२ नोव्हेंबर, १९९६ रोजी चरखी दादरीवर कझाकस्तान एरलाइन्सच्या इल्युशिन इल-७६ आणि सौदीया बोईंगच्या ७४७ प्रकारच्या विमानांची दाट धुक्यात थेट धडक होऊन दोन्ही विमाने कोसळली. या अपघातात दोन्ही विमानातील सर्व ३४९ जणांचा मृत्यू झाला. ही तेव्हापर्यंत हवेत झालेल्या विमानांच्या धडकांपैकी सर्वात प्राणघातक टक्कर होती. ही भारतातील सर्वात प्राणघातक विमान वाहतूक आपत्ती आहे तसेच आतापर्यंतची तिसऱ्या क्रमांचाची प्राणघातक विमान (९/११ न धरता) आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →