भिवानी जिल्हा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

भिवानी जिल्हा

हा लेख भिवानी जिल्ह्याविषयी आहे. भिवनी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

भिवानी जिल्हा हा उत्तर भारतातील हरियाणा राज्यातील २२ जिल्ह्यांपैकी एक आहे. २२ डिसेंबर १९७२ रोजी हा जिल्हा बनवला गेला. त्यावेळेस हा राज्यातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा होता. परंतु नंतर चरखी दादरी हा एक स्वतंत्र जिल्हा बनविला आणि याचे क्षेत्रफळ कमी झाले. सिरसा हा आता राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. भिवानी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५,१४० चौरस किमी (१,९८० चौ. मैल) आहे. आणि यात २४४२ गावे प्रशासकीयदृष्ट्या नियंत्रित केली जातात. इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार याची लोकसंख्या १६,३४,४४५ होती.

याचे प्रशासकीय केंद्र भिवनी शहरात आहे. हे शहर राष्ट्रीय राजधानी दिल्लीपासून १२४ किलोमीटर (७७ मैल) अंतरावर आहे. जिल्ह्यातील सिवनी, लोहारू, तोषम, बवनी खेरा, कोहलावास, लांबा ही अन्य प्रमुख शहरे आहेत. इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार फरीदाबाद आणि हिसार जिल्ह्यांनंतर हा हरियाणाचा तिसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →