गोवा इन्क्विझिशन

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ख्रिश्चन धर्मावर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांना व चेटुक (ख्रिस्ती धार्मिक मान्यतेनुसार) करणाऱ्या स्त्री-पुरुषांना शिक्षा देण्यासाठी पोर्तुगिज गोवा इन्क्विझिशन (ख्रिस्ती धार्मिक चौकशीमंडळ) स्थापन केले गेले. या शिक्षांमध्ये माणसांना जिवंत जाळण्यापर्यंत काहीही केले जात असे. हिंदूंचा छळ करण्यासाठी गोवा इन्क्विझिशन ची स्थापना झाली. ख्रिस्ती मिशनरी फ्रान्सिस झेवियर यांच्या आग्रहास्तव, गोव्यात गोवा इन्क्विझिशनची स्थापना झाली. याद्वारे कथित संत क्रूरकर्मा फ्रान्सिस झेव्हिअर याने गोव्यात सक्तीच्या धर्मप्रसारास सुरुवात केली. १५६० साली ख्रिस्ती धर्मन्यायपीठाची (इन्क्विझिशन) स्थापना होऊन स्थानिक लोकांचा छळ सुरू झाला. इ.स. १५६० ते इ.स. १८१२ पर्यंत या इन्क्विजिशनचा अनियंत्रित आणि क्रूर कारभार गोव्यात बेछूटपणे चालू राहिला. या काळात एकूण ५ इन्क्विझिशन्स म्हणजे ख्रिस्ती धर्मसभा बसल्या. प्रत्येक ख्रिस्ती सभेत आधीचे नियम अधिक जाचक करून हिंदूंना छळण्यासाठी नवनवे जाचक नियम बनवले जात असत. ख्रिश्चन धर्म न स्वीकारणाऱ्या हिंदूंचे कान कापण्यासाठी, त्यांचे पाय, नडगी, जबडे फोडण्यासाठी, स्त्रियांचे स्तन कापण्यासाठी विशिष्ट रचना तयार करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →