गोवा मुक्ती दिन (पोर्तुगीज:Dia da libertação de Goa) (कोकणी:गोंय मुक्ति दिस) गोवा मुक्ती दिन, भारतामध्ये दरवर्षी १९ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. पोर्तुगीजांनी इथं आल्यानंतर ख्रिस्ती धर्मपरिवर्तनाची मोहीमच सुरू केली. आणि त्याला विरोध करणाऱ्यांवर अघोरी अत्याचार सुरू केले. पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश या पोर्तुगीजांच्या अत्याचारांना गोव्याचे मूळ हिंदू कंटाळले होती. त्यामुळे सशस्त्र आणि सविनय अशा दोन्ही मार्गानं गोवन जनतेने स्वातंत्र्यासाठी आंदोलने सुरू केली. भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय' राबवत गोवा मुक्त केला. भारताने गोवा आणि दमण दीव स्वतंत्र केले.
गोवा या राज्याला दिनांक १९ डिसेंबर १९६१ रोजी पोर्तुगीजांपासून मुक्ती मिळाली म्हणून या दिवशी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो. यादिवशी भारतीय सेनेनं पोर्तुगीजांपासून गोवा मुक्त केला. तसेच या दिवशी भारत युरोपियन राजवटीपासून पूर्णपणे मुक्त झाला होता.याच दिवशी संध्याकाळी पोर्तुगीज सरकारने भारतीय सैन्यापुढे सपशेल शरणागती पत्करली आणि रात्री आठ वाजता पोर्तुगीज गव्हर्नर जनरल वासाल द सिल्वा यानी शरणांगती पत्रावर सही केली. ऑपरेशन विजय ही मोहीम काही तासांत फत्ते झाली.
गोवा मुक्ती दिन
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.