गोवा मुक्तिसंग्राम

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

गोवा राज्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठीचे आंदोलन केले गेले त्यास गोवा मुक्तिसंग्राम असे संबोधतात.

१९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सेनेने गोवा, दमण व दीव हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील ऊर्वरित प्रदेश मुक्त केला. दादरा व नगर हवेली हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील प्रदेश त्यापूर्वीच मुक्त करण्यात आला होता. गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे ४५० वर्षांचे राज्य समाप्त झाले. त्यामुळे दरवर्षी १९ डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून पाळला जातो. पोर्तुगीजांनी गोवा येथे आल्यानंतर ख्रिस्ती धर्मपरिवर्तनाची मोहीमच सुरू केली. आणि त्याला विरोध करणाऱ्यांवर अघोरी अत्याचार सुरू केले. पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश या पोर्तुगीजांच्या अत्याचारांना गोव्याचे मूळ हिंदू कंटाळले होती. त्यामुळे सशस्त्र आणि सविनय अशा दोन्ही मार्गानं गोवन जनतेने स्वातंत्र्यासाठी आंदोलने सुरू केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पोर्तुगीजही आपोआप गोव्यातून काढता पाय घेतील असा अंदाज होता. पण तसं झालं नाही. उलट पोर्तुगालचा शासक सालाझार अधिक कठोर झाला. त्यानं इथं अत्याचारांची मालिकाच सुरू केली. पोर्तुगीजांविरोधात उठाव होऊ नये म्हणून कडक निर्बंध टाकले. लिहिणे, बोलणे यावरही निर्बंध लावले गेले. भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय' राबवत गोवा मुक्त केला. भारताने गोवा आणि दमण दीव स्वतंत्र केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →