हिंदूंचा छळ

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

हिंदूंचा छळ ही हिंदूं इतिहासातील एक प्रमुख घटना आहे, ज्यामुळे निर्वासितांच्या लाटा बनल्या आणि इतर समुदायांची निर्मिती झाली. आजपर्यंत भारतात आणि जगात इतरत्र सहिष्णू असलेल्या हिंदूंचा छळ करण्यात आला आहे. या छळाकडे माध्यमांद्वारे दुर्लक्ष केले जाते असे दिसून येते. हिंदू धर्म किंवा श्रद्धेमुळे होणारा छळ जगभरातील प्रत्येक सहिष्णू हिंदू समुदायाला भेडसावत आहे. हिंदूंनी ऐतिहासिक आणि चालू असलेला धार्मिक छळ आणि पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश आणि इतर अनेक घटक म्हणजे हिंदूंचा छळ होय. यात हिंदू विरोधी भावना हिंदूंचा यांचा ही समावेश होतो. आक्रमक मुस्लिम लुटारू यांना हिंदू संस्कृती विरुद्ध हिंसाचाराचा माग चोखाळला आहे असे दिसते. प्रदीर्घ काळ हिंदूंचा धार्मिक छळ केलेला आढळतो. मध्ययुगीन मुस्लिम काळात भारतात जबरदस्तीने हिंदूंचे धर्मांतर करून मुस्लिम लोकसंख्या वाढवली गेली. हिंदू ज्ञानाची लुट केली गेली. हिंदू आणि बौद्ध राजांनी राज्य केलेल्या राज्यांवर हल्ले केले गेले, हिंदू संपत्तीची लुट केली गेली. हिंदू वर गैर-मुस्लिम म्हणून निर्बंध आणि भेदभाव सहन करावा लागला होता. सिंधमधील मूर्तिपूजक हिंदूंविरुद्धच्या मोहिमेच्या सुरुवातीच्या टप्प्यात शहरांमध्ये हिंदूं नरसंहार झाला होता. भारतात आजही हिंदूंचा छळ होत आहे. अमेरिकन इतिहासकार आणि लेखक विल ड्युरंट यांनी त्यांच्या १९३५ मध्ये लिहिलेल्या पुस्तकात “भारतावर इस्लामचे आक्रमण ही इतिहासातील सर्वात रक्तरंजित आहे. इस्लामिक इतिहासकार आणि विद्वानांनी इसवी सन ८०० ते इसवी सन १७०० या काळात हिंदूंच्या कत्तली, जबरदस्तीने धर्मांतर, हिंदू स्त्रिया आणि मुलांचे गुलाम करणे व त्यांची विक्री करणे आणि मंदिरे नष्ट करणे या गोष्टी मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने नोंदवल्या आहेत. (द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन: अवर ओरिएंटल हेरिटेज, पृष्ठ ४५९).

पर्शियन इतिहासकार वासाफ यांनी आपल्या 'तज्जियात-उल-अमसार वा ताजरियात उल असर' या पुस्तकात लिहिले आहे.

जेव्हा अलाउल-दीन खिलजीने खंबेतच्या आखाताच्या डोक्यावर असलेल्या कंबायत शहरावर कब्जा केला, तेव्हा त्याने इस्लामच्या गौरवासाठी सर्व प्रौढ पुरुष हिंदू रहिवाशांना ठार मारले, रक्ताच्या नद्या वाहल्या, देशातील स्त्रियांना गुलाम केले त्यांचे सर्व सोने, चांदी आणि दागिने लुटले, सुमारे वीस हजार हिंदू स्त्रीयांना त्याच्या खाजगी गुलाम बनवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →