गुझेरा किंवा गुझेरात हा ब्राझील देशातील एक संकरित गोवंश असून, हिचा मूळ गोवंश गुजरातमधील कांकरेज गाय आहे. त्यामुळे या गोवंशाला कांकरेज किंवा अझुलेगो असेसुद्धा म्हणतात. इ.स. १८७० मध्ये भारतीय 'कांकरेज' आणि ब्राझीलमधील 'क्रिउलो' यांच्या संकरातून हा नवीन गोवंश निर्माण झाला. अमेरिकेतील ब्राह्मण गाईच्या निर्मितीत या गोवंशाचा प्रामुख्याने वापर करण्यात आला.
गुझेरात गोवंशात भारतीय कांकरेजचा आकार, रंग आणि गुणधर्मसुद्धा मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे हा प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा सहज टिकतो. याची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असून कातडे जाड असल्यामुळे रक्तशोषक किडींचा प्रादुर्भाव सुद्धा कमी दिसून येतो. या व इतर गुणधर्मामुळे गुझेरात गोवंश ब्राझील मध्ये चांगलाच पसरला. इ.स. २०१० मध्ये गुझेरातची संख्या ९२,००० पर्यंत पोहोचली. ही ब्राझीलमधील एकूण पशुधनाच्या ३% आहे.
गुझेरात गाय
या विषयावर तज्ञ बना.