वेचुर किंवा वेच्चुर (मल्याळम:വെച്ചൂര് പശു) हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः केरळात आढळतो. याचा उगम केरळातील गाव वेचुर, ता.वैकम, जिल्हा कोट्टायम येथील असल्यामुळे या गोवंशाला वेचुर हे नाव पडले. धवलक्रांती किंवा दुग्ध क्रांतीच्या लाटेत भारतात मोठ्या प्रमाणात संकर सुरू झाले आणि हा गोवंश नष्ट होण्याच्या मार्गाला लागला. परंतु वेळीच सावध होऊन केरळ कृषी विद्यापीठाच्या टीमने याचे जतन आणि संवर्धन केल्यामुळे या गोवंशाचे अस्तित्त्व टिकून आहे. 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'नुसार हा जगातील सर्वात बुटका गोवंश आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेचुर गाय
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!