हिमाचली पहाडी किंवा हिमाचली पहारी हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः हिमाचल प्रदेशात आढळून येतो. याला "पहारी", "देसी", "स्थानिक", "गौरी" आणि "हिमधेनु" असेही म्हणतात. हिमाचल प्रदेशातील चंबा, कांगडा, किन्नौर, कुल्लू, मंडी, शिमला, सिरमौर, लाहुल आणि स्पीती जिल्ह्यांचा प्रजनन क्षेत्रात समावेश होतो. प्राण्यांची काम करण्याची क्षमता मध्यम असून, अरुंद, उतार, लहरी, डोंगराळ प्रदेशावर काम करण्यात हा गोवंश तरबेज आहे. ही जात पर्वतीय भूभाग, अत्यंत थंड हवामान आणि चारा टंचाई यांच्याशी जुळवून घेते. या जातीच्या कातडीचा रंग प्रामुख्याने काळा आणि काळपट तपकिरी असतो. पशू लहान ते मध्यम आकाराचे असतात ज्यात संक्षिप्त दंडगोलाकार शरीर, लहान पाय, मध्यम वशिंड, आडवे कान आणि तुलनेने लांब शेपटी असतात. शिंगे मध्यम आकाराची असून, मुख्यतः बाजूकडील आणि वरच्या दिशेने वक्र असतात. या जातीचा उपयोग प्रामुख्याने दूध, शेणखत आणि गोमूत्र यासाठी होतो. प्राण्यांची देखभाल व्यापक व्यवस्थापन प्रणालीवर केली जाते आणि चरायला पाळली जाते. दुधाचे उत्पादन कमी आहे सरासरी ५३८ किलो प्रति स्तनपान (प्रति स्तनपान ३०० ते ६५० किलो दरम्यान) आणि सरासरी दुधाची चरबी ४.६८% आहे (४.०६ ते ५.८३ % पर्यंत).
'राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB)' निकषानुसार हा दुहेरी हेतूचा गोवंश म्हणून ओळखला जातो.
हिमाचली पहाडी गाय
यामागील विज्ञान आणि इतिहास.