ग्वांगचोऊ (मराठी लेखनभेद: ग्वांगचौ ; चिनी: 广州 ; पीनयीन: Guangzhou ;), जुन्या काळातील अन्य नाव कांतोन (मराठी लेखनभेद: कॅंटोन ; रोमन लिपी: Canton ;) हे चिनी जनता-प्रजासत्ताकातील एक शहर असून ग्वांगदोंग प्रांताचे राजधानीचे शहर आहे. दक्षिण चीन समुद्रास मिळणाऱ्या मोती नदीच्या त्रिभुज प्रदेशात हॉंगकॉंगापासून १२० कि.मी. अंतरावर हे शहर वसले आहे. मोती नदी व दक्षिण चीन समुद्राच्या सान्निध्यामुळे ग्वांगचोऊ पूर्वीपासून महत्त्वाचे व्यापारी बंदर आहे.
ग्वांगचोऊ चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील तिसरे मोठे, तर देशाच्या दक्षिण भागातील सर्वांत मोठे शहर आहे. इ.स. २००० सालातील जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६० लाख, तर ग्वांगचोऊ महानगर क्षेत्राची लोकसंख्या १.१८५ कोटी होती.
क्वांगचौ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.