केन्या एरवेझ (इंग्लिश: Kenya Airways) ही आफ्रिकेच्या केन्या देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९७७ साली स्थापन झालेल्या केन्या एरवेझचे मुख्यालय नैरोबी येथे असून तिचा मुख्य वाहतूकतळ नैरोबीच्या जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. १९९६ साली खाजगीकरण झालेली केन्या एरवेझ ही आफ्रिकेमधील पहिलीच कंपनी होती.
प्रिल १९९५पर्यंत कंपनीची संपूर्ण मालकी सरकारकडे होती. १९९६मध्ये तिचे खाजगीकरण करण्यात आले जी पहिली अशी आफ्रिकन कंपनी होती जिचे खाजगीकरण यशस्वी झाले. केन्या एरवेझ सध्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर चालवली जाते. त्यामध्ये सगळ्यात जास्त हिस्सा केन्या सरकारचा (२९.८%) असून त्यानंतर केएलएमचा (२६.७३%) आहे. उरलेले शेअर्स इतर खाजगी मालकांचे आहेत. २०१० सालापासून केन्या एरवेझ स्कायटीम समूहाचा सदस्य आहे.
जानेवारी २०१३ला केन्या एरवेझ सहारन क्षेत्रातील आघाडीची विमानवाहतूक कंपनी होती. आफ्रिकन विमानकंपन्यांमध्ये आसन क्षमतेनुसार केन्या एरवेझचा चौथा क्रमांक लागत होता. ही कंपनी जून २०१० मध्ये स्काय टीमची पूर्ण सभासद झाली तसेच १९७७ पासून ती आफ्रिकन एरलाईनची सभासद आहे.
केन्या एरवेझ
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?