कुवेत एरवेझ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

कुवेत एरवेझ

कुवेत एरवेझ (अरबी: الخطوط الجوية الكويتية) ही मध्य पूर्वेतील कुवेत ह्या देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इ.स. १९५३ साली स्थापन झालेली कुवेत एरवेझ कुवेत शहराजवळील कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जगातील ३४ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते.

मध्य पूर्वेतील अतिशय वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असणारा कुवेत हा दुसरा देश आहे. या देशाची एरलाइन अतिशय आधुनिक आणि संपत्तिवान आहे. कुवेत एरवेझने विमान वाहतूक सेवेतील गुणवत्ता ग्राहकासांठी उच्चतम कशी ठेवता येईल आणि जागतिक पातळीवर आपली विमानसेवा नवलाईची कशी होईल याकडे लक्ष केन्द्रित केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →