कुलदीप यादव (१४ डिसेंबर, इ.स. १९९४ - ) हा उत्तर प्रदेशकडून खेळणारा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा मंदगती डावखोरा चायनामन गोलंदाज, १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१४ मध्ये भारत १९ वर्षांखालील क्रिकेट संघकडून खेळला होता, ज्यात त्याने स्कॉटलंड संघाविरुद्ध हॅटट्रीक घेतली होती.
२०१२ मध्ये त्याला मुंबई इंडियन्स संघाने, आणि २०१४ मध्ये त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने करारबद्ध केले, त्या संघाचे २०१४ चॅंपियन्स लीग ट्वेंटी२० स्पर्धेत त्याने प्रतिनिधित्व केले.
ऑक्टोबर २०१४ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली, परंतु एकाही सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. फेब्रुवारी २०१७ मध्ये बांगलादेशविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यामध्ये त्याची भारतीय कसोटी संघामध्ये निवड झाली पण अकरा खेळाडूंत तो नव्हता.
यादवने २५ मार्च, २०१७ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथे कसोटी पदार्पण केले व ६८ धावा देउन ४ बळी मिळविले.
कुलदीप यादव
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.