कमाल खान (पत्रकार)

या विषयावर तज्ञ बना.

कमाल खान हे भारतीय पत्रकार आणि संपादक होते. एनडीटीव्ही इंडिया या राष्ट्रीय हिंदी वाहिनीचे ते लखनौ, उत्तर प्रदेशचे ब्युरो चीफ होते. खान त्यांच्या काव्यात्मक व्हॉईसओव्हर्स आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणाच्या सखोल विश्लेषणासाठी ओळखले जात असत. त्यांच्या प्रभावी भाषेतील पत्रकारितेसाठी ते प्रसिद्ध होते.

खान यांच्या पत्रकारितील योगदानाबद्दल रामनाथ गोयंका पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला गेला. याबरोबरच राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कार दिला होता. एनडीटीव्हीचे सुप्रसिद्ध पत्रकार रवीश कुमार त्यांचा लोकप्रिय कार्यक्रम असलेल्या प्राईम टाईममध्ये कमाल खान यांच्या बातम्या नेहमी दाखवायचे.

१४ जानेवारी २०२२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →