रवीश कुमार

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

रवीश कुमार

रवीश कुमार (५ डिसेंबर १९७४) हे एक भारतीय पत्रकार आणि लेखक आहेत. ते एनडीटीव्ही इंडियाचे माजी वरिष्ठ कार्यकारी संपादक आहेत. या वाहिनीचे लोकप्रिय कार्यक्रम प्राइम टाइम, हम लोग, रविश की रिपोर्ट आणि देस की बात यांचे सूत्रसंचालन करत होते.



रवीश यांना २०१९ मध्येआशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला. "गरीब आणि सामान्य जनतेचा आवाज सार्वजनिक मंचावर उठवल्याबद्दल" पत्रकारिता क्षेत्रामधील त्यांच्या सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

रवीश यांना दोनदा रामनाथ गोयंका पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट पत्रकार या श्रेणीत त्यांना सन्मानित करण्यात आले. २०१६ मध्ये द इंडियन एक्सप्रेसने आपल्या "१०० सर्वाधिक प्रभावशाली भारतीय लोकांमध्ये" रवीश कुमारांना समाविष्ट केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →