एसीए-केडीसीए क्रिकेट मैदान (किंवा आंध्रा क्रिकेट असोसिएशन-क्रिष्णा डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशन मैदान) हे भारतातील आंध्र प्रदेश राज्यामधील दोन क्रिकेट मैदानांचे सामाईक नाव आहे. ते विजयवाडा जवळील, कृष्णा जिल्ह्यातील, मुलापाडू ह्या गावात वसलेले आहे. ते कृष्णा जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (एसीए-केडीसीए) मालकिचे असून, आंध्रा क्रिकेट असोसिएशनच्या आखत्यारित येते.
३० मे २०१६ रोजी अनुराग ठाकूर यांनी मैदानाचे उद्घाटन केले. दक्षिणेच्या मैदानाचे नाव चुक्कापल्ली पित्चैया मैदान आणि उत्तरेकडील मैदानाचे नाव देविनेनी वेंकट रमणा-प्रनीता मैदान असे ठेवण्यात आले, ज्यांचे अधिकृत उद्धाटन १० नोव्हेंबर १९१६ रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते झाले.
एसीए-केडीसीए क्रिकेट मैदान
या विषयातील रहस्ये उलगडा.