एम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

एम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)

एम. ए. चिदंबरम मैदान किंवा चेपॉक मैदान हे भारतातील चेन्नई शहरातील क्रिकेट मैदान आहे. मैदानाची स्थापना १९१६ साली झाली असून देशातील हे सर्वात जुने आणि सतत वापरात असणारे क्रिकेट मैदान आहे. पूर्वी मद्रास क्रिकेट क्लब मैदान म्हणून ओळखले जाणाऱ्या ह्या मैदानाचे नाव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष एम. ए. चिदंबरम ह्यांच्या नावावरून देण्यात आले आहे. तामिळनाडू क्रिकेट संघ आणि भारतीय प्रीमियर लीगमधील संघ, चेन्नई सुपर किंग्स ह्या संघांचे हे होम ग्राउंड आहे.

चेपॉकमध्ये पहिली कसोटी १० फेब्रुवारी १९३४ साली सुरू झाली, तर सर्वात पहिला रणजी करंडक सामना येथे १९३६ साली खेळवला गेला. भारतीय क्रिकेट संघाला ह्या मैदानावर त्यांचा पहिला कसोटी विजय मिळाला तो १९५२ साली इंग्लंडविरुद्ध. चेपॉक येथे १९८६ साली भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळवला गेलेला कसोटी सामना हा कसोटी इतिहासातील बरोबरीत सुटलेला फक्त दुसरा कसोटी सामना होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →