इंग्लंडचा क्रिकेट संघ ऑक्टोबर ३०, २०१२ ते जानेवारी २७, २०१३पर्यंत भारताच्या दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात चार कसोटी, पाच एकदिवसीय आणि दोन ट्वेंटी२० सामने खेळवले. येथे येण्यापूर्वी इंग्लंडचा संघ तीन दिवस दुबईमध्ये सराव करण्यासाठी उतरला होता. कसोटी व ट्वेंटी२० सामने खेळून झाल्यावर इंग्लिश संघ घरी परतला व एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी परत भारतास आला होता. मधल्या काळात पाकिस्तानचा संघ २-टी२० आणि ३-एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारतात आला होता.
भारताला २-१ ने हरवून, इंग्लंडने १९८४-८५ नंतर पहिल्यांदाच भारतामध्ये कसोटी मालिका जिंकली. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनच्या मते हा मालिका विजय ऑस्ट्रेलियामधील २०१०-११ च्या ॲशेस मालिका विजयापेक्षा मोठा आहे. अलास्टेर कूक बद्दल तो म्हणतो की "बऱ्याच वर्षांतील इंग्लंडच्या कदाचित सर्वात मोठ्या यशामध्ये त्याने इंग्लंडचे चांगले नेतृत्व केले".
२३ डिसेंबर २०१२ रोजी सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती घोषित केली.
इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.