पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, २०१६

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

पाकिस्तान क्रिकेट संघाने ३ जुलै ते ७ सप्टेंबर २०१६ दरम्यान इंग्लंड आणि आयर्लंड दौरा केला. या दौऱ्यावर इंग्लंडविरूद्ध ४-कसोटी, ५-एकदिवसीय आणि १-टी२० सामन्यांची मालिका खेळवली गेली. त्याशिवाय कसोटी मालिकेआधी सॉमरसेट आणि ससेक्सविरूद्ध ३-दिवसीय कसोटी आणि वूस्टरशायरविरूद्ध २-दिवसीय सामने खेळवले गेले. तसेच एकदिवसीय मालिकेआधी आयर्लंडविरूद्ध २-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेली.

इंग्लंडच्या पाकिस्तानविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्यांदाच मैदानावरील पंचांऐवजी टीव्ही पंचांच्या मदतीने पुढच्या पावलाचा नो-बॉल ठरवण्याच्या पद्धतीची चाचणी घेण्यात आली. तिसऱ्या एकदिवसीया सामन्यात, इंग्लंडने ४४४ धावा करून एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा नवीन विक्रम प्रस्थापित केला. ॲलेक्स हेल्सने १७१ धावा करून इंग्लिश फलंदाजातर्फे सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मोडला.

कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. इंग्लंडने एकदिवसीय मालिकेत ४-१ असा विजय मिळवला आणि एकमेव टी२० सामना पाकिस्तानने ९ गडी राखून जिंकला. ह्या सामन्यांसाठी मे २०१६ मधील श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत सुरू झालेली गुण-पद्धत वापरली गेली. इंग्लंडने सुपर सिरिज १६-१२ अशी जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →