श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, २०१६

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

श्रीलंका क्रिकेट संघाने ८ मे पासून ५ जुलै २०१६ पर्यंत इंग्लंडचा दौरा केला. ह्या दौऱ्यावर इंग्लंडविरूद्ध ३-कसोटी सामन्यांनंतर, ५-एकदिवसीय आणि एका टी२० सामन्याचे आयोजन केले गेले होते. त्याशिवाय कसोटी मालिकेअगोदर एसेक्स आणि लीस्टरशायरविरूद्ध प्रथम-श्रेणी सामन्यांचाही समावेश होता. याचबरोबर एकदिवसीय मालिकेआधी आयर्लंडविरूद्ध २-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले होते.

पहिले दोन प्रथम श्रेणी सामने अनिर्णित राखल्यानंतर, श्रीलंकेला कसोटी मालिकेत २-० असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आयर्लंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेने २-० असा विजय मिळवला. त्यानंतर इंग्लंडने एकदिवसीय मालिका ३-० आणि एकमेव टी२० सामना सुद्धा जिंकला.

एप्रिल २०१६, मध्ये इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने, मालिकेत गुण-पद्धत वापरण्याचा प्रस्ताव ठेवला, आणि दोन्ही संघांनी त्यासाठी सहमती दर्शवली. त्यानंतर, गुण पद्धतीला सुपर सिरीज असे नाव दिले गेले आणि ह्या आणि इंग्लंडच्या पाकिस्तान विरूद्धच्या मालिकेसाठी मान्यता दिली गेली. कसोटी मध्ये विजेत्या संघाला ४ गुण दिले जातील, तर एकदिवसीय आणि टी२० सामन्यासाठी २-गुण दिले जातील. सर्व जमेस धरून चषक दिला जाणार नसला तरी £25,000चे पारितोषिक सर्व खेळाडूंमध्ये विभागुण देण्यात येइल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →