आय.आय.एफ.ए. पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा आयफा पुरस्कार प्रेक्षकांकडून निवडला जातो आणि विजेत्याची घोषणा समारंभात केली जाते.

आयफा पुरस्कार हे २००० मध्ये सुरू झाले व पहिला समारंभ लंडन येथे झाला होता. त्यानंतर हा पुरस्कार सोहळा दक्षिण आफ्रिका, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, कॅनडा, अमेरिका, अबुधाबी आणि भारतात मुंबई आणि जयपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. २०२० मध्ये, हा पुरस्कार सोहळा मार्चमध्ये इंदूर येथे होणार होता; परंतु तो पुढे ढकलण्यात आला आणि नोव्हेंबर २०२० मध्ये इंस्टाग्रामवर ऑनलाइन विजेत्यांची घोषणा करण्यात आली.

ह्या श्रेणीतील पहिल्या पुरस्काराच्या मानकरी बिवी नं १ चित्रपटासाठी सुश्मिता सेन होती. या श्रेणीत जया बच्चन यांनी सर्वाधिक ३ पुरस्कार जिंकले आहेत; त्यानंतर दिव्या दत्ता यांनी २ पुरस्कार जिंकले आहेत. दत्ता आणि किरण खेर यांनी सर्वाधिक ५ नामांकने जिंकली आहेत.

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार फक्त पाच अभिनेत्रींनी जिंकले आहेत; कालक्रमानुसार त्या आहेत: राणी मुखर्जी, कंगना राणावत, अनुष्का शर्मा, तब्बू आणि प्रियंका चोप्रा.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →