आय.आय.एफ.ए. पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

आय.आय.एफ.ए. पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी द्वारे वार्षिक पुरस्कार सोहळ्याचा एक भाग म्हणून दिला जातो, ज्याने तिच्या पदार्पणाच्या चित्रपटात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभिनेत्रीला सन्मानित केले जाते. मूळतः "आयफा अवॉर्ड फॉर फ्रेश फेस ऑफ द इयर (महिला)" म्हणून ओळखले जाणारा हा पुरस्कार, २००५ मध्ये अधिकृतपणे त्याला नवीन शीर्षक देण्यात आले.

आयफा पुरस्कार हे २००० मध्ये सुरू झाले व पहिला समारंभ लंडन येथे झाला होता. त्यानंतर हा पुरस्कार सोहळा दक्षिण आफ्रिका, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, कॅनडा, अमेरिका, अबुधाबी आणि भारतात मुंबई आणि जयपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. २०२० मध्ये, हा पुरस्कार सोहळा मार्चमध्ये इंदूर येथे होणार होता; परंतु तो पुढे ढकलण्यात आला आणि नोव्हेंबर २०२० मध्ये इंस्टाग्रामवर ऑनलाइन विजेत्यांची घोषणा करण्यात आली.

२००१ मध्ये ह्या श्रेणीच्या पहिल्या वर्षात, चार वेगवेगळ्या अभिनेत्रींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला - करीना कपूर, किम शर्मा, प्रीती झंगियानी आणि शमिता शेट्टी.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →