आय.आय.एफ.ए. पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

यामागील विज्ञान आणि इतिहास.

आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार (आय.आय.एफ.ए. किंवा आयफा) तर्फे हिंदी चित्रपटांसाठीच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्याचा एक भाग म्हणून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी आय.आय.एफ.ए. पुरस्कार दिला जातो, ज्यामध्ये प्रमुख भूमिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभिनेत्रीला सन्मानित केले जाते. प्राप्तकर्ता प्रेक्षकांद्वारे निवडली जाते आणि विजेत्याची घोषणा समारंभात केली जाते.

आयफा पुरस्कार हे २००० मध्ये सुरू झाले व पहिला समारंभ लंडन येथे झाला होता. त्यानंतर हा पुरस्कार सोहळा दक्षिण आफ्रिका, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, कॅनडा, अमेरिका, अबुधाबी आणि भारतात मुंबई आणि जयपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. २०२० मध्ये, हा पुरस्कार सोहळा मार्चमध्ये इंदूर येथे होणार होता; परंतु तो पुढे ढकलण्यात आला आणि नोव्हेंबर २०२० मध्ये इंस्टाग्रामवर ऑनलाइन विजेत्यांची घोषणा करण्यात आली.

ह्या श्रेणीतील पहिल्या पुरस्काराच्या मानकरी हम दिल दे चुके सनम चित्रपटासाठी ऐश्वर्या राय होत्या. आलिया भट्ट आणि राणी मुखर्जी यांनी ४ वेळा हा पुरस्कार जिंकण्याचा विक्रम केला आहे. त्यानंतर विद्या बालन यांचा क्रमांक लागतो ज्यांनी ३ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. ऐश्वर्या राय, करीना कपूर आणि दीपिका पदुकोण या तीन अभिनेत्रींनी दोनदा हा पुरस्कार जिंकला आहे. पदुकोण यांच्या नावावर सर्वाधिक ११ नामांकने आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →