फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रीला दिला जातो त्यांच्या मागील वर्षाच्या चित्रपटातील कामगिरीसाठी. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक मुख्य पुरस्कार आहे.

प्रथम पुरस्कार १९५४ मध्ये प्रदान करण्यात आला आणि पहिला पुरस्कार मीना कुमारी यांना बैजू बावरा चित्रपटातील गौरीच्या भूमिकेसाठी प्रदान करण्यात आला; जिथे त्यांनी मानसिंग तोमरच्या दरबारात १६ व्या - १७ व्या शतकात राहणारे ग्वाल्हेरचे प्रख्यात शास्त्रीय गायक बैजू बावरा यांच्या प्रेमीकेची भूमिका केली होती. पुढे मीना कुमारींना १९५५ मध्ये (परिणिता) आणि १९६३ मध्ये (साहेब, बीवी और गुलाम) या चित्रपटांसाठी पुन्हा पुरस्कार मिळाला.रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील भूमिकेसाठी २०२४ मध्ये आलिया भट्ट यांना नवीनतम पुरस्कार प्रदान करण्यात आला. ह्या आधी भट्टयांना चार वेळा ह्या श्रेणीतील पुरस्कार मिळाला आहे. आजवर नूतन, काजोल व आलिया भट्ट ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ५ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे तर माधुरी दीक्षितने सर्वाधिक वेळा (१४) नामांकन मिळवले आहे.

१९८७ आणि १९८८ मध्ये कोणत्याच फिल्मफेर पुरस्कारांसारखा हा देखील कोणालाच दिला गेला नाही. फक्त १९७४ मध्ये हा पुरस्कार विभागून डिंपल कापडिया व जया बच्चन यांना देण्यात आला होता त्यांच्या प्रत्येकीच्या बॉबी आणि अभिमान चित्रपटातील कामगिरीसाठी. ह्या पुरस्काराचे विजेते अनेक वेळा सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्तम पदार्पण अभिनेत्री आणि सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) साठी पण नामांकीत / विजेते झाले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →