फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार हा दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम गायिकेला दिला जाणारा पुरस्कार आहे. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. जरी पुरस्कार सोहळ्याची स्थापना १९५४ मध्ये झाली असली तरी, सर्वोत्तम पार्श्वगायकाची श्रेणी १९५९ मध्ये सुरू करण्यात आली होती. हा पुरस्कार सुरुवातीला १९६७ पर्यंत पुरुष आणि महिला गायकांसाठी समान दिला जात असे. पुढील वर्षी (१९६८ पासून) ही श्रेणी विभागली गेली आणि तेव्हापासून दोन पुरस्कार देणे सुरू झाले व पुरुष गायकांसाठी आणि महिला गायकांसाठी स्वतंत्रपणे दिले गेले.
१९५९ मध्ये लता मंगेशकरांना पहिला पुरस्कार मिळाला होता मधुमती चित्रपटातील "आजा रे परदेसी" या गाण्यासाठी. पुढे मंगेशकरांना अजून तीन वेळा पुरस्कार मिळाला. १९६७ पर्यंत वेगळ्या श्रेण्या होण्याआधी फक्त मंगेशकरांना पुरस्कार आणि नामांकन मिळाले आहे. पठाण या चित्रपटातील "बेशरम रंग" या गाण्यासाठी २०२४ मध्ये शिल्पा राव यांना नवीनतम पुरस्कार प्रदान करण्यात आला. आजवर आशा भोसले व अलका याज्ञिक ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ७ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे. याज्ञिक यांना सर्वाधिक वेळा (३७ वेळा) नामांकन मिळाले आहे.
१९८७ आणि १९८८ मध्ये कोणत्याच फिल्मफेर पुरस्कारांसारखा हा देखील कोणालाच दिला गेला नाही. हा पुरस्कार अनेक वेळा एकाच गाण्यातील दोन गायिकेंना दिला गेला आहे तसाच अनेक वेळा भिन्न गाण्यांसाठी विभागून देखील दिला गेला आहे.
फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार
या विषयावर तज्ञ बना.