फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार

यामागील विज्ञान आणि इतिहास.

फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. जरी फिल्मफेअर पुरस्कार १९५४ मध्ये सुरू झाले असले तरी, सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीची श्रेणी पुढील वर्षी १९५५ मध्ये सुरू झाली.

अभिनेत्री उषाकिरण यांना फनी मजुमदार दिग्दर्शीत बादबान चित्रपटातील मच्छीमार मुलगी मोहनीयाच्या भुमिकेसाठी पहिला पुरस्कार देण्यात आला. ह्या वर्षी दुसरे कोणतेही नामांकन नव्हते. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील भूमिकेसाठी २०२४ मध्ये शबाना आझमी यांना नवीनतम पुरस्कार प्रदान करण्यात आला. आझमींना या आधी २०१७ मध्ये देखील हा पुरस्कार मिळाला होता. देवदास कादंबरीतील चंद्रमुखीच्या भुमिकेसाठी तीन वेळा हा पुरस्कार देण्यात आला आहे: वैजयंतीमाला (१९५७), माधुरी दीक्षित (२००३) आणि कल्की केकला (२०१०).

१९८७ आणि १९८८ मध्ये कोणत्याच फिल्मफेर पुरस्कारांसारखा हा देखील कोणालाच दिला गेला नाही. अजून २०२४ पर्यंत हा पुरस्कार कधीही विभागून दिला गेला नाही. ह्या पुरस्काराचे विजेते अनेक वेळा सर्वोत्तम अभिनेत्री, सर्वोत्तम पदार्पण अभिनेत्री आणि सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) साठी पण नामांकीत / विजेते झाले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →