आयर्लंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२५–२६

थोडक्यात पण महत्त्वाचे.

आयर्लंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२५–२६

आयर्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ मध्ये बांगलादेश क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. या दौऱ्यावर दोन कसोटी आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले. सप्टेंबर २०२५ मध्ये, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने २०२५-२६ च्या घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.

मूळतः ही मालिका दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी२० सामन्यांसह खेळवण्यात येणार होती. क्रिकेट आयर्लंडने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला वेळापत्रकातून एक कसोटी सामना कमी करण्याची विनंती केली. नंतर दोन्ही बोर्डांनी दोन कसोटी आणि तीन आं.टी२० सामन्यांवर सहमती दर्शवली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →