बांगलादेश महिला क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी आयर्लंड महिला क्रिकेट संघ नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२४ मध्ये बांगलादेशचा दौरा करत आहे. या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामन्यांच्या मालिका खेळविल्या जातील. एकदिवसीय मालिका २०२२-२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग असेल. द्विपक्षीय मालिका म्हणून आयर्लंड महिला संघाचा बांगलादेशचा हा पहिलाच दौरा आहे. याआधी त्यांनी २०१४ मध्ये आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी बांगलादेशचा दौरा केला होता. नोव्हेंबर २०२४ मध्ये, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) संपूर्ण दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२४-२५
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.