आकाश (टॅबलेट)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

आकाश हा ॲन्ड्रॉइड प्रणालीवर चालणारा एक टॅबलेट संगणक आहे. डेटाविंड ह्या मॉंत्रियाल-स्थित कंपनीने ह्याचे डिझाईन तयार केले असून त्याचे उत्पादन भारतात केले जाईल. ह्या टॅबलेटचा वापर व्हिडियो पाहण्यासाठी, संगीत ऐकण्यासाठी, पुस्तके व मासिके वाचण्यासाठी तसेच इंटरनेट ब्राउझिंगसाठी करता येईल. अंदाजे ६० अमेरिकन डॉलर किंमत असलेला व यूबीस्लेट ७ ह्या नावाने विकला जाणारा आकाश हा सर्व आधुनिक सुविधा असणारा जगातील सर्वांत स्वस्त टॅबलेट असेल.

ह्या टॅबलेटचा उपयोग भारतभरातील २५,०००कॉलेजे व ४०० विद्यापीठे इ-शिक्षणासाठी करतील असा अंदाज केला गेला आहे. भारत सरकारने अंदाजे १ लाख आकाश टॅबलेट उपकरणे खरेदी केल्याचे वृत्त आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →