कझाकस्तान

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

कझाकस्तान

कझाकस्तान (कझाक: Қазақстан; रशियन: Казахстан), अधिकृत नाव कझाकस्तानाचे प्रजासत्ताक (कझाकः Қазақстан Республикасы, कझाकस्तान रेस्पुब्लिकासी; रशियन: Республика Казахстан, रेस्पुब्लिका कझाकस्तान) हा मध्य आशिया आणि पूर्व युरोपातील संधिप्रदेशावर वसलेला एक देश आहे. क्षेत्रफळानुसार नवव्या क्रमांकाचा हा देश जगातील सर्वांत मोठा भूवेष्टित देश आहे. याचे २७,२७,३०० वर्ग कि.मी. विस्तारलेले क्षेत्रफळ पश्चिम युरोपाहून मोठे आहे. जगभरातील ६ सार्वभौम तुर्की देशांपैकी तो एक आहे. रशिया, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, चीन या देशांना आणि कास्पियन समुद्राला लागून याच्या सीमा आहेत. मंगोलियाशी याच्या सीमा थेट भिडल्या नसल्या, तरीही मंगोलियाच्या सर्वांत पश्चिमेकडील टोकापासून याची पूर्व टोकाकडील सीमा केवळ ३८ कि.मी. अंतरावर आहे. इ.स. १९९७ साली कझाकस्तानातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असलेल्या अल्माटीपासून देशाची राजधानी हलवून नुरसुल्तान येथे नेण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →