अशोक चव्हाण

यामागील विज्ञान आणि इतिहास.

अशोक चव्हाण

अशोक शंकरराव चव्हाण (२८ ऑक्टोबर , १९५८ - हयात) हे ८ डिसेंबर, २००८ ते ११ नोव्हेंबर, २०१० या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. २६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ५ डिसेंबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्यांची निवड केली आणि ८ डिसेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी ते सांस्कृतिक, उद्योग, खाण या खात्यांचेही मंत्री होते.



चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत, ज्या दोघांनीही विधीमंडळाच्या दोन व संसदीय दोन्ही सभागृहाचे सदस्यत्व मिळविलेले आहे.

इ.स. २००९ सालातील महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत भोकर विधानसभा मतदारसंघतून अशोकराव चव्हाण आमदार म्हणून निवडून आले. तसेच त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश समितीने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे चव्हाण सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यापूर्वी काँग्रेस पक्षातर्फे विलासराव देशमुख यांची अशी दोनदा निवड झाली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →