पृथ्वीराज आनंदराव चव्हाण (मार्च १७, इ.स. १९४६ - हयात) हे भारताच्या काँग्रेस पक्षामधील एक राजकारणी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. १० नोव्हेंबर, इ.स. २०१० रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली. महाराष्ट्राचे २२ वे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी मोठा राजकीय वारसा आहे. त्यांनी ११ नोव्हेंबर, इ.स. २०१० रोजी पदाची शपथ घेतली. २०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी चव्हाण ह्यांनी मुख्यमंत्रिरीपदाचा राजीनामा दिला. ह्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पृथ्वीराज चव्हाण
या विषयातील रहस्ये उलगडा.