अली हे एक दक्षिणात्य चित्रपट अभिनेता आणि टीवी कलाकार असून, मुख्यतः तेलुगू सिनेमात काम करतात. अली तेलुगू व्यतिरिक्त तामिळ आणि हिंदी चित्रपटात सुद्धा काम करतात. आजपर्यंत अली यांनी एक हजार पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे. अली यांनी पवन कल्याण आणि पुरी जगन्नाद या दोन दक्षिणात्य चित्रपट कलाकारांसोबत जास्त प्रमाणात काम केले. अली याना दोन फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण आणि दोन नंदी पुरस्कार मिळाले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अली (अभिनेता)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.