अलका कुबल (सासरच्या अलका आठल्ये) ह्या मराठी-हिंदी चित्रपटांतून काम करणाऱ्या एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत. बालकलाकार म्हणून त्यांनी लहानपणापासूनच व्यावसायिक नाटकांतून काम करायला सुरुवात केली. इयत्ता १०वी मध्ये असताना त्यांनी चक्र या चित्रपटात छोटी भूमिका केली होती. नटसम्राट, संध्याछाया, वेडा वृंदावन अशा काही नाटकांत त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. स्त्रीधन या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत व्यावसायिक अभिनेत्री म्हणून प्रवेश केला. माहेरची साडी ह्या प्रसिद्ध चित्रपटाच्या यशामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यासोबतच लेक चालली सासरला, तुझ्यावाचून करमेना, माहेरचा आहेर, दुर्गा आली घरा, काळूबाईच्या नावानं चांगभलं, सुवासिनीची सत्त्वपरीक्षा, अग्निपरीक्षा असे त्यांचे अनेक चित्रपट लोकप्रिय झाले. यांपैकी काही चित्रपटांची निर्मिती देखील त्यांनी केली. अमृतवेल, युगंधरा, बंदिनी, येरे येरे पैसा, आकाशझेप, माझी आई काळुबाई अशा दूरचित्रवाणी मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केल्या.
अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडके, सचिन पिळगांवकर अशा मराठीतील आघाडीच्या नायकांबरोबर त्यांनी भूमिका केल्या. हिंदीमधल्या शिर्डीचे साईबाबा या चित्रपटातील भूमिका उल्लेखनीय आहे.
अलका कुबल
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.