माहेरची साडी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

माहेरची साडी (१९९१) हा एक ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन विजय कोंडके (दिवंगत मराठी चित्रपट दिग्गज दादा कोंडके यांचे पुतणे) यांनी केले होते. चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांत ₹१२ कोटी (US$1.6 दशलक्ष)ची कमाई केली, ज्यामुळे तो सर्वकाळातला सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट बनला. त्यावेळच्या कोणत्याही मराठी चित्रपटापैकी ही सर्वाधिक कमाई होती.

माहेरची साडी चित्रपट दोन वर्षांहून अधिक काळ प्रतिष्ठित प्रभात टॉकीजवर चालला. हा चित्रपट एक कौटुंबिक विषयावरील फॅमिली ड्रामा आहे. हा अत्यंत यशस्वी राजस्थानी चित्रपट "बाई चली ससरीये" (1988)चा रिमेक होता, ज्याचा नंतर 1994 मध्ये जुही चावला आणि ऋषी कपूर यांना घेऊन साजन का घर म्हणून हिंदीमध्ये रिमेक करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →