रामचंद्र विनायक फडके उर्फ सुधीर फडके (जुलै २५, १९१९ − जुलै २९, २००२) हे महाराष्ट्रातील संगीतकार व गायक होते. बाबूजी या नावानेदेखील त्यांना ओळखले जाते. त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व वादातीतआहे. फडके यांनी मराठी व्यतिरिक्त अनेक हिंदी चित्रपटांमध्येही गाणी गायली आणि संगीतबद्ध केली.
फडके यांनी अनेक अजरामर गीते तयार केली आहेत. त्यांची अनेक भक्तीगीते, सुगम संगीत आणि चित्रपट गीते प्रचंड लोकप्रिय आहेत.
कवी ग.दि. माडगूळकर यांचे अजरामर गीतरामायण ही फडके यांच्या सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे. हा कार्यक्रम आजही एवढा लोकप्रिय आहे की, या कार्यक्रमाच्या स्टेज परफॉर्मन्सला आजही प्रचंड गर्दी होते. फडके यांनी यातील सर्व ५६ गाणी संगीतबद्ध केली.
सुधीर फडके
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.