गजानन दिगंबर माडगूळकर(१ ऑक्टोबर १९१९ - १४ डिसेंबर १९७७) हे विख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेते होते. ते त्यांच्या नावाची आद्याक्षरे ग.दि.मा. या नावाने लोकप्रिय आहेत. गदिमांची सर्वात उल्लेखनीय रचना असलेल्या गीतरामायणाची बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. गीतरामायण या त्यांच्या सर्वात उल्लेखनीय कलाकृतीमुळे त्यांना सध्याच्या काळातील आधुनिक वाल्मिकी देखील म्हणले जाते.
गदिमांनी त्यांच्या कारकिर्दीत १५७ पटकथा आणि २००० गाणी लिहिली. त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटांसाठी कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. लिखाणासोबत त्यांनी काही चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला.
भारत सरकारने १९६९ मध्ये गदिमांना पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. १९५७ मध्ये गदिमांना संगीत नाटक अकादमीचा उत्कृष्ट नाट्य लेखक पुरस्कार मिळाला. २०१९ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले गेले. हा सोहळा साजरा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विविध कार्यक्रम आणि उत्सव आयोजित केले होते.
गजानन दिगंबर माडगूळकर
थोडक्यात पण महत्त्वाचे.