आशा पाटील (इ.स. १९३६ - १८ जानेवारी, इ.स. २०१६) या एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेत्री होत्या. त्या मूळच्या हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावच्या होत्या.
आशा पाटील यांनी दादा कोंडके, अनंत माने आणि यशवंत भालकर यांच्या अनेक चित्रपटांमध्ये साकारलेल्या आई आणि मावशीच्या भूमिका साकारल्या. याआधी अशा भूमिकांमध्ये रत्नमाला दिसत. त्यांनी १५०हून अधिक मराठी-हिंदी चित्रपटांत कामे केली. आशा पाटील यांनी विनोदी भूमिकांबरोबर दुःखाशी संघर्ष करणारी माय अशाही भूमिका साकारल्या. डॉ. काशीनाथ घाणेकर, दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, विक्रम गोखले, अलका कुबल, प्रिया अरुण, वर्षा उसगावकर अशा आघाडीच्या कलाकारांसोबत त्यांनी काम केले होते.
१९६० साली अंतरीचा दिवा या माधव शिंदे दिग्दर्शित चित्रपटामधून आशा पाटील यांनी साहाय्यक अभिनेत्री म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. नंतर त्यांनी नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या तो मी नव्हेच या नाटकातही काम केले. या नाटकातील त्यांची भूमिका उल्लेखनीय ठरली होती. ’एकच प्याला’च्या काही प्रयोगांतही त्या होत्या.
चित्रपटांतील भूमिकांबद्दल त्यांना उत्कृष्ट अभिनयाची अनेक पारितोषिके मिळाली आहेत.
आशा पाटील
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.