अरविंद विष्णू गोखले (जन्म : इस्लामपूर, १९ फेब्रुवारी १९१९; - २४ ऑक्टोबर १९९२) हे एक मराठी लघुकथा लेखक होते. त्यांचे. शिक्षण पुणे व मुंबई येथे बी.एस्सी. पर्यंत (१९४०) झाल्यावर १९४१ मध्ये त्यांना ‘दक्षिणा फेलो’ होण्याचा बहुमान प्राप्त झाला. पुढे त्यांनी दिल्लीच्या ‘इंपीरिअल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट’मधून सायटोजेनिटिक्सचा अभ्यासक्रम पुरा केला. अमेरिकेतील व्हिस्कॉन्सिन विद्यापीठात तांत्रिक वृत्तपत्रविद्येचा अभ्यास करून त्यांनी एम.एस. ही पदवी मिळविली. १९४३पासून त्यांनी पुण्याच्या शासकीय कृषी महाविद्यालयात संशोधन आणि अध्यापन केले. १९६३नंतर ते मुंबईच्या धरमसी कंपनीत नोकरी करीत होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अरविंद गोखले
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.